पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

पाचल|वार्ताहर
राजापूर तालुक्यातील पाचल येथील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून १५ फेब्रुवारी २०२० रोजी ही निवडणुक होत आहे. राजकीय आखाडा बनलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्स्कुता लागून राहिली आहे.
गेली आठ वर्षे न्यायालयीन प्रक्रियेत अडकून राहिलेल्या या संस्थेचा निकाल नुकताच जाहिर झाला असून धर्मादाय आयुक्त रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक घेण्याचा निकाल न्यायालयाने दिल्याने त्याअनुषंगाने पाचल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम धर्मादाय आयुक्तांनी दिलेले निवडणूक निर्णय अधिकारी म. ग. ठसाळे यांनी जाहीर केला आहे.
दि. १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. सन २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीसाठी अध्यक्ष व नऊ सभासद यांची निवड यावेळी होणार आहे.
यासाठी दि. १ फेब्रुवारी रोजी मतदारांची कच्ची मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. या कच्या यादीबाबत कोणाचा आक्षेप असल्यास दिनांक २ व ३ फेबु्रवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत तो लेखी स्वरूपात द्यावयाचा आहे. त्याअनुषंगाने प्राप्त आक्षेपाची चौकशी करून दि. ०४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अंतीम सभासद यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दि. ०५ व ०६ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्जांचे वाटप होणार आहे. तर दि. ०७ ते १० फेब्रुवारी या कालावधीत उमेवारी अर्जाची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणे, अंतीम उमेदवार यादी प्रसिध्द करणे व उमेदवारांना निवडणुक चिन्हांचे वाटप करणे या बाबी दि. १३ फेब्रुवारी २०२० रोजी होणार आहे. दिन्. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळात निवडणूक मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता निवडणूक मतमोजणी प्रक्रिया होवून त्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.
या निवडणूकीसाठी सरस्वती विद्यामंदिर पाचल प्रशालेची कै. प्रसाद वासुदेव ताम्हणकर स्मृती भवन ही इमारत निवडणूक निर्णय अधिकारी यांना कार्यालयीन कामकाज पाहण्यासाठी देण्यात आलेली आहे. संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांची धावपळ चालू झाली असून गेली आठ वर्षे एकमेकांवर कुरापती करण्यात दंग असणारे संस्थाचालक आता सभासद शोधण्यात व्यस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत.
—————————————————————————————————————————-

जाहिरात4