राजापूरात ‘भारतीय अर्थव्यवस्था आजची आणि उद्याची’ या विषयावर विख्यात अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांचे व्याख्यान

राजापूर | वार्ताहर

येथील राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे वतीने शनिवार २८ डिसेंबर रोजी इयत्ता ११ वी १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विख्यात अर्थतज्ञ अनिल बोकील यांचे व्याखान आयोजित करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, विविध विषयांची माहिती व्हावी या उद्देशाने राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक व मार्गदर्शकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. याचाच भाग म्हणून सद्याची भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावे त्यांच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

संस्थेच्या नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राजापूर येथे सकाळी ९.३० वाजता हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थाध्यक्ष जावेद ठाकूर भुषविणार आहेत.
या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरिकांनी घ्यावा असे आवाहन संस्थाध्यक्ष जावेद ठाकूर व संचालक मंडळ, प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने यांनी केले आहे.

जाहिरात4