जाकादेवी येथील माता आणि मुलाचाही झाला मृत्यू

रत्नागिरी । वार्ताहर

तालुक्यातील जाकादेवी येथे पती-पत्नीच्या भाडणांत पेटवून घेतलेल्या पत्नीसह तीच्या चार वर्षीय मुलाचाही सोमवारी उपचारादरम्यान मृत्यु झाला. मागील आठवड्यात जाळून घेतल्याची घटना घडली होती.

पत्नीने स्वत:ला पेटवून घेताच तिला वाचवायला गेलेल्या पतीसह चार वर्षांचा मुलगा देखील भाजल्याचा प्रकार घडला आहे. भाजलेल्या पत्नीसह मुलाला रातोरात कोल्हापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. परंतु, गंभीररित्याभाजलेल्या दोघांचा अखेर मृत्यु झाला.

याबाबत मिळालेल्या माहिती अमित कृष्णा मिठबावकर (वय ३३, रा . जाकादेवी, मुळ : सिंधूदुर्ग) व त्यांची पत्नी अनुष्का मिठबावकर (वय ३२) यांच्यात कौटुंबिक वाद झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की संतप्त होऊन अनुष्काने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. पत्नीने पेटवून घेतल्याने तिला वाचविण्यासाठी धवलेला तिचा पती अमित व चार वर्षाचा मुलगा वेदांत हे दोघेही भाजले. या घटनेत अनुष्क आणि चार वर्षांचा वेदांत गंभीररित्या भाजले होते. अनुष्का व मुलगा वेदांत याना उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. मागील काही दिवस त्यांच्यावर कोल्हापूर येथील रूगालयात उपचार सुरू होते. अखेर सोमवारी या दोघांचाही उपचारा दरम्यान मृत्यु झाला.