उमराठ आंबेकरवाडी खुर्द येथील विद्युत खांब धोकादायक

उमराठ आंबेकरवाडी खुर्द येथील धोकादायक विद्युत खांब बदलण्याच्या मागणीचे निवेदन महावितरण अभियंत्यांना देताना मनसेचे पदाधिकारी व अन्य.
विद्युत खांब तत्काळ बदलण्याची मागणी अन्यथा गुहागर मनसेचा जनआंदोलनाचा इशारा

गुहागर । वार्ताहर

तालुक्यातील उमराठ आंबेकरवाडी खुर्द येथील विद्युत खांब धोकादायक अवस्थेत असून यामुळे येथील घरांना धोका निर्माण झाला आहे. सदर धोकादायक विद्युत खांब लवकरात लवकर बदलावेत अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा गुहागर मनसेच्यावतीने निवेदनाद्वारे महावितरण अभियंत्यांना देण्यात आला आहे.

गुहागर तालुक्यातील उमराठ आंबेकरवाडी खुर्द येथील मुख्य लाईन असलेला विद्युत खांब पूर्णपणे सडला आहे. यामुळे सदरचा विद्युत खांब अतिशय धोकादायक स्थितीत असून कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. मुख्य म्हणजे सदर विद्युत खांबाजवळ घरे असून हा विद्युत खांब कोसळल्यास मोठया प्रमाणात जिवितहानी व वित्तहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदरचा धोकादायक विद्युत खांब लवकरात लवकर बदलावा अन्यथा गुहागर मनसेच्यावतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी गुहागर मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर, प्रशांत साटले, निलेश गमरे, संदिप आंबेकर आदी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात4