कणकवली शिवाजीनगरमध्ये चोरट्यांनी सात घरे फोडली

जाहिरात-2

कणकवली | प्रथमेश जाधव 

जोरदार पडणारा मुसळधार पाऊस व अंधार याचा फायदा घेत कणकवली शिवाजीनगर मध्ये चोरट्यांनी पुन्हा सात घरे फोडली. कणकवलीत चोरांचा पुन्हा सुळसुळाट झाला आहे. शिवाजीनगर येथील राजरत्नम पणामकर, रंजना सावंत, वासुदेव मोंडकर, शैलेश तांबे, विकास पाटील, प्रगती पाटकर,  बळीराम आडेलकर, यांच्या घरी चोरी झाली आहे अद्यापही कोणाचा किती मुद्देमाल गेला याची माहिती उपलब्ध झाली नाही.  मात्र पोलिस घटनास्थळी येऊन तपास करीत आहेत. चोरट्याने यांची कपाटे लॉकर फोडून चोरी केली आहे.

जाहिरात4