ग्रामपंचायत निवडणूक ; 2 डिसेंबर पर्यंत ऑफलाईन अर्ज करता येणार

रत्नागिरी  : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या 09 नोव्हेंबर 2022 च्या आदेशान्वये राज्यातील 7751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) निवडणूक कार्यक्रम देण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानुसार 28 नोव्हेंबर 2022 ते 02 डिसेंबर 2022 या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र भरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

आता इच्छूक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये व त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने (Off line) स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ 02 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 05.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे तहसिलदार सर्वसाधारण, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

जाहिरात4