नाम पोहोचले अर्जुना व कोदवली पर्यंत

फाऊंडेशनच्या वतीने नॅचरल सोल्युशनचे सीईओ डॉ. अजित गोखले यांनी केली दोन्ही नदीपात्राची पाहणी

राजापूर |  प्रतिनिधी

नगर परीषद, महसूल प्रशासन आणि नाम फाऊंडेशनच्या पुढाकाराने आणि लोकसहभागातुन शहरातील कोदवली आणि अर्जुना नदीपात्रातील गाळ उपशाच्या कामाला आता आणखी गती मिळणार आहे. गुरूवारी नाम फाऊंडेशनचे जलतज्ञ व नॅचरल सोल्युशनचे सीईओ डॉ. अजित गोखले यांनी राजापूरात भेट देत या दोन्ही नद्यांच्या गाळाची प्रत्यक्ष पहाणी केली.

नगर परीषद, महसूल प्रशासन आणि नाम फाऊंडेशनच्या पुढाकाराने आणि लोकसहभागातुन शहरातील कोदवली आणि अर्जुना नदीपात्रातील गाळ उपशाचे काम हाती घेण्यात येणार आहे. याची प्राथमिक बैठक 22 नोव्हेंबर रोजी झाली होती. त्यानंतर आता शुक्रवारी 2 डीसेंबर रोजी गाळ निमुर्लन समितीची बैठक होणार आहे.

नाम फाऊंडेशनने देखील गाळ उपशासाठी तांत्रिक बाबी लवकरात लवकर पुर्ण करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी नाम फाऊंडेशनच्या जलसंवर्धन व गाळ उपसा या एकूणच कामात महत्वपुर्ण भूमिका बजावणारे डॉ. गोखले यांनी गुरूवारी राजापूरात भेट दीली व पहाणी केली.

नगर परीषदेत मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी गाळ निर्मुलन समिती सदस्य महेश शिवलकर, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, नगर परीषदेचे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव, पत्रकार प्रकाश नाचणेकर, अभियंता स्वपनील पडयार आदी उपस्थीत होते.

याप्रसंगी डॉ. गोखले यांनी त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात जलसंवर्धनाच्या माध्यमातुन केलेल्या कामाची माहीती दीली. त्यानंतर त्यांनी शहरातील अर्जुना व कोदवली नद्यांची प्रत्यक्ष पहाणी केली. तसेच कोदवली धरण परिसराचीही डॉ. गोखले यांनी पहाणी केली.

शुक्रवारी देखील ते पहाणी करणार असून याबबातचा विस्तृत अहवाल नामकडे सादर करणार आहेत. त्यानंतर अन्य तांत्रिक बाबींची पुर्तता करून या गाळ उपशाबाबत प्रत्यक्षात कार्यवाही सुरू होईल असे डॉ. गोखले यांनी सांगितले.

जाहिरात4