Sindhudurg | एएनएमच्या २१ परिचारिका सेवेत कायम ; आमदार नितेश राणेंचे मानले आभार

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने परिचारिका सेवेत कायम

कणकवली (प्रतिनिधी)
कोरोना काळात कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या एएनएमच्या परिचारिकांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडे पत्रव्यवहार करून सेवेत कायम करून घेतले. तर भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २१ परिचारिकांना आरोग्य सेवेत कायमचे रुजू करून घेण्यासाठी प्रयत्न केले.त्यामुळे मिळालेल्या यशाबद्दल सेवेत कायम झालेल्या परिचारिकांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.

कोरोना महामारीत आरोग्य व्यवस्था ढासळली होती. परिचारिका आणि डॉक्टर जीवाची बाजी लावून काम करत होते. या काळात कंत्राटी पद्धतीने कामावर घेतलेल्या शेकडो परिचारिकांना आता दिलासा मिळाला आहे. या परिचारिका ११ महिन्याच्या करार‌ केला होता. व तो करार संपुष्टात आल्यावर परिचारिकांना घरी बसावे लागले होते. आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्र स्तरावर पाठपुरावा करून परिचारिकांना न्याय मिळवून दिला.त्याबद्दल सर्व परिचारिकांनी ओम गणेश निवासस्थानी येऊन आमदार नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

जाहिरात4