मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चौके मालवण येथे जल्लोषी स्वागत

ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी ; मनसे नेते अमित ठाकरेही उपस्थित

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी सायंकाळी मालवण दौऱ्यावर पोहचले. तालुकाध्यक्ष विनोद सांडव व मनसे, मनवीसे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चौके व कुंभारमाठ येथे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनसे नेते अमित ठाकरे यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. MNS President Raj Thackeray received a rousing reception at Chowke Malvan

राज ठाकरे यांचे चौके, कुंभारमाठ जानकी सभागृह व हॉटेल सॅफरॉन येथे आगमन होताच सुहसिनींनी औक्षण केले.
त्यांनंतर राज ठाकरे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थिती तालुक्यातील युवकांचा मनसे प्रवेश झाला.

यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, माजी आमदार परशुराम उपरकर, शिरीष सावंत, निशा आजगावकर, माया माणगावकर, वैष्णवी सरफरे, सुजाता फाटक, साक्षी चुडनाईक, भारती वाघ, अविनाश अभ्यंकर, तालुकाध्यक्ष विनोद सांडव, विल्सन गिरकर, अमित इब्रामपूरकर, उदय गावडे, विशाल ओटवणेकर, संदीप लाड यांसह हॉटेल व्यावसायिक विनय गावकर, मालवण येथील व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, नितीन तायशेटये, रवी तळाशीलकर, गणेश प्रभुलीकर व अन्य व्यापारी तसेच मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. व्यापारी यांनी टोल प्रश्नी, भूमिगत वीज वहिनी प्रश्नी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली.

राज ठाकरे देवबाग येथे मुक्काम करून शुक्रवारी सकाळी आंगणेवाडी येथील भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत. अशी माहिती तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी दिली.

जाहिरात4