वैश्य गुरु प. पू.श्री श्री वामनाश्रम स्वामी यांची पदयात्रा कणकवली दाखल

नगराध्यक्ष नलावडे याची यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थितीत,विविध क्षेत्रातील मान्यवर यात्रेत सहभागी

काशीपर्यंत चालणार ही पदयात्रा

संतोष राऊळ (कणकवली)
प. पू.श्री श्री वामनाश्रम स्वामी यांची शांकर एकात्मता पदयात्रा कणकवली येथे दाखल झाली.केरळ- कालडी येथून पुण्यभूमी काशीपर्यंत ही पदयात्रा चालणार आहे.
स्वामीजींच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी गुरू भक्तांची गर्दी उसळली आहे. कणकवली नगरीत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वामींच्या यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थिती दर्शविली होती तर विविध मान्यवर यात्रेत सहभागी झाले होते. कणकवली मुख्य चौकातून ही यात्रा समर्थ भालचंद्र महाराज मठ येथे बाजारपेठेतून रवाना झाली.
स्वामींच्या दर्शन कार्यक्रम कणकवली येथे श्री दीपक अंधारी यांच्या निवासस्थानी असणार आहेत.
इतर बातम्या :
खारेपाटण तावडेवाडी येथील संजय तावडे यांच्यासह ५० कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

जाहिरात4