शॉक लागून मृत्यू झालेल्या तावडे यांच्या कुटुंबियांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाई द्या ; अन्यथा उपोषणास बसणार

नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी दिले उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग यांना निवेदन

कणकवली I मयूर ठाकूर: कणकवली बसस्थानकासमोर २९ ऑगस्ट २०२२ रोजी एका इसमाचा मृतदेह सापडला होता. मात्र त्या मृतदेहाची दोन दिवस ओळख पटली नव्हती. दोन दिवसांनंतर तो मृतदेह कणकवली येथील बाळकृष्ण शांताराम तावडे यांचा तो मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी देखील याबाबत वेळोवेळी दखल घेतली होती. तावडे यांचा मृत्यू हायवे लगत असलेल्या लाईट च्या पोलला स्पर्श होऊन शॉक लागून झाल्याचे पोस्टमार्टेम मध्ये उघड झाले. याबाबत आज ३ ऑक्टोबर रोजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, सावंतवाडी यांना निवेदन दिले.

सदर निवेदनात असे म्हटले आहे की, कणकवली शहरातील नागरिक बाळकृष्ण शांताराम तावडे वय वर्ष ५० रा. टेंबवाडी, कणकवली यांचा दि. २९ ऑगस्ट २०२२ रोजी कणकवली बसस्थानका समोर आपल्या खात्यांतर्गत विद्युत पोलास स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. सदर मृत्यू हा पोल क्याप उघडी असल्यामुळे खात्याच्या हलगर्जीपणामुळे झाला. शवविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवालात सदर मृत्यू हा शॉक लागून झाला असा स्पष्ट उल्लेख आहे. तश्या प्रकारची नोंद कणकवली पोलिस स्थानकात देखील आहे. आज एक महिना उलथून गेला तरी आपल्याकडून सदर कुटुंबास कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही किंवा आश्वासित देखील केली नाही.

तरी पुढील दहा दिवसात नुकसान भरपाई न मिळाल्यास नगरसेवक या नात्याने प्रांत ऑफिस, कणकवली समोर सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता बसणार आहे. माझे वरिष्ठ नेते व जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत देखील उपोषणास सामील होणार आहेत. असे निवेदन उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडी यांना दिले आहे.

जाहिरात4