Breaking News : लोंबकळणारी विद्युत भारीत तार हाताने बाजूला करणे बेतले जीवाशी

सौंदळ पाजवेवाडी येथील वृद्धेचा जागीच मृत्यू

राजापूर । प्रतिनिधी
पोलवरील तुटून लोंबकळणारी विद्युत भारीत तार हाताने बाजूला करत असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने सौंदळ पाजवेवाडी येथील एका 66 वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला आहे. आशा राजाराम पवार असे या मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशा राजाराम पवार (६६, सौंदळ, पाजवेवाडी) या सोमवार दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेजारच्या घरातून आपल्या घरी परतत असताना घरापुढील परसवात विद्युत भारित तार लोंबकळताना दिसली. ही तार हाताने बाजूला करत असताना या विद्युत भारीत तारेमुळे आशा पवार यांना विजेचा तीव्र धक्का बसला. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी राजापूर पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री.दुधाळे करत आहेत.

जाहिरात4