फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त थिबा पॅलेस येथे रविवारी प्रदर्शन

रत्नागिरी |

आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले 14 ऑगस्ट च्या मध्यरात्री हा
सोहळा झाला. मात्र देशाची फाळणी झाल्याने लाखो जण विस्थापित झाले, अनेकांना यात प्राण गमवावे लागले. त्यामुळे 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळण्यात येणार आहे या संदर्भात एक प्रदर्शन थिबा पॅलेस येथे आयोजित करण्यात आले आहे.

त्या काळी विस्थापित झालेल्या व हिंसाचारामुळे जीव गमवावा लागलेल्या साऱ्यांच्या वेदना वर्तमान व भावी पिढीला माहिती व्हाव्या व त्याची सदैव आठवण राहावी यासाठी हा फाळणी वेदना स्मृतिदिन घोषित करण्यात आलेला आहे. भेदभाव, वैमनस्य आणि द्वेष भावना संपविण्यासाठी प्रेरित व्हावे व एकता आणि सामाजिक सदभावना सोबतच मानवी संवेदना सशक्त व्हावी या उद्देशाने हा दिवस पाळला जाणार आहे. या दिवसाची आठवण करून देणाऱ्या ऐतिहासिक दस्तऐवजांचे एक प्रदर्शन उद्या थिबा पॅलेस येथे आयोजित
करण्यात आले आहे. हे प्रदर्शन नागरिकांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत खुले राहणार आहे असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

जाहिरात4