आजादी गौरव पदयात्रेला चिपळुणात अभूतपूर्व प्रतिसाद

प्रचंड उत्साह आणि जोशात तिरंगा डौलाने फडकला!

चिपळूण | प्रतिनिधी

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांचे स्मरण करण्यासाठी व या लढ्यात काँग्रेसच्या योगदानाची नवीन पिढीला माहिती व्हावी, यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेसने आजादी गौरव पदयात्रा काढली असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड आणि चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात काँग्रेसतर्फे आजादी गौरव पदयात्रा काढली जात आहे. या अनुषंगाने शनिवारी चिपळुणात यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेची सुरुवात इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून झाली. चिंचनाकामार्गे ही पदयात्रा चिपळूण नगर परिषदेसमोर पोहोचल्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून शिवरायांचा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, `जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या पदयात्रेदरम्यान ‘भारत माता की जय’, भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो, ‘जय जवान, जय किसान,’ ‘हम सब एक है’! अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हातात तिरंगा डौलाने फडकत होता.
ही पदयात्रा गोवळकोट कमानी येथे पोहोचल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर काँग्रेसच्या वतीने आझादी गौरव पदयात्रेची आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव साजरा करण्यापूर्वी देश स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले. त्या सर्वांची आठवण व्हावी, या दृष्टीने ही पदयात्रा महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचेही त्यांनी कौतुक केले.

चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव म्हणाले, की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेसने आझादी गौरव पदयात्रा सुरू केली आहे. या पदयात्रेची सुरुवात गुजरात साबरमती येथून झाली असून ११७१ किलोमीटर पार करून ५८ दिवसानंतर राजघाटी येथे पोहोचणार आहे. ही आझादी गौरव पदयात्रा संपूर्ण देशात काढली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. आमदार नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात जिल्हानिहाय-तालुकानिहाय पदयात्रा काढली जात आहे. यामध्ये चिपळुणात आज शनिवारी पदयात्रा होत आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून देश स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांचे स्मरण व्हावे व या लढ्यात काँग्रेसच्या योगदानाची नवीन पिढीला माहिती व्हावी, यासाठी ही पदयात्रा असल्याचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सांगितले. तर आमदार शेखर निकम यांनीही काँग्रेसच्या आजादी गौरव पदयात्रेला सदिच्छा भेट देत शुभेच्छा दिल्या
यावेळी रत्नागिरी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सरचिटणीस सुरेश कातकर शहराध्यक्ष लियाकत शाह, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, ज्येष्ठ नेते इब्राहिम दलवाई, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष अन्वर जबले, माजी नगरसेवक संजय रेडीज, करामत मिठागरी, माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे, ज्येष्ठ कार्यकर्ते आबा डाकवे, संदीप लवेकर, माजी नगरसेविका गौरी रेळेकर, सफा गोठे, जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्ष अश्विनी भुस्कुटे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, शहराध्यक्ष श्रद्धा कदम, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष रवीना गुजर, ज्येष्ठ नेत्या सुमती जांभेकर, विद्यार्थी काँग्रेसच्या शहराध्यक्ष गौरी हरधारे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अल्पेश मोरे, विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले, यशवंत फके, अशोक भुस्कुटे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गुलजार कुरवले, सेवादलचे तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, माजी नगरसेवक सुरेश राऊत, रफिक मोडक, सुरेश पाथरे, राकेश दाते, सिकंदर नाईकवडी, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू थरवळ, मनोज शिंदे, वासुदेव मेस्त्री, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह, अविनाश हरधारे, सयाजी पवार, संजय डेरवणकर, जनार्दन पवार, अल्पसंख्याक सेलचे तालुका उपाध्यक्ष मैनुद्दीन सय्यद, शिवाजी पवार, कैसर देसाई, सरफराज घारे, शकील तांबे, सज्जाद कादरी, मैनुद्दीन सय्यद, संजय शिगवण, शकील तांबे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी व माजी नगरसेवक शिरीष काटकर यांची देखील उपस्थिती होती.

जाहिरात4