अखेर मंडणगड नगरपंचायतीसमोर फडकला भारतीय तिरंगा 

मंडणगड l प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव शासकीय पातळीवर विविध उपक्रमांनी साजरा होते आहे 13 ते 15 ऑगस्ट 2021 या तीन दिवसांचे कालवधीत सर्व शासकीय कार्यालयात शासकीय इतंमामात ध्वज संहितेचे पालन करीत ध्वजारोहण करण्याची विशेष मोहीम आखली गेलेली असताना. मंडणगड नगरपंचायतीचे कार्यालयाबाहेर ध्वजास्तंभावर आज सकाळी तिरंगा झेडा फडकवण्यात न आल्याने शहरातील नागरीकांना आश्चर्याचा धक्काच बसला नगरपंचायतीचे कार्यालय शासकीय कार्यालयात येत नाही असा प्रश्न पडल्याने शहरातील नागरीकांनी नगराध्यक्ष मुख्याधिकारी व अगदी तहसलिदारांनाही या संदर्भात प्रश्न उपस्थित केला घर घर तिरंगा मोहीमेचे अंमलबजावणी करताना नगरपंचायतीने नागरीकांना घरघरात तिरंगा फडकवण्यासाठी सुचना मार्गदर्शन केले आज नगरपंचायत छतावर पागोळीचे खाली नागरीकांना वाटण्यात आलेला तिरंगा मात्र काठीला लावून फडवण्यात आला होता मात्र ध्वजंस्तभावर तिरंगा नसणे ही बाब सर्वानांच खटणारी होती तालुक्याचे तहसलिदारांना या संदर्भात नगरपंचायत प्रशासनाची बहुदा कानउघडी केली अथवा समज दिल्यावर सकाळी 9.00 च्या सुमारास नगरपंचायत कर्मचारी व मुख्याध्याकारी यांच्या उपस्थितीत पुर्ण शासकीय इतमाने तिरंगा फडकवून आधी केलेली चूक तातडीने सुधारण्यात आली. या संदर्भात कुठल्याही शासन निर्णयात नगरपंचायतीने मुख्य ध्वजस्तंभावर तिरंगा फडकावा असा उल्लेख कोठेही करण्यात आलेला नसल्याचा खुलास नगरपंचायत प्रशासनाचेवतीने कऱण्यात आला या संदर्भात नगरपंचायतीचे नगराध्यक्षा सौ. सोनल बेर्डे यांच्याशी विचारणा केली त्यां म्हणाल्या की या संदर्भात मुख्याधिकारी यांना विचारला असता आपणास आधीच्या दोन दिवसात ध्वजारोहण करणे आवश्यक असल्याचे कोठेही सुचीत करण्यात आलेले नसल्याने आपण केवळ स्वातंत्र दिनी झेडा फडकावू असे सांगण्यात आले. नगरपंचायतीचे माजी बांधकाम सभापती दीनेश लेंडे यांनी या विषया संदर्भात तहसिलदार मंडणघड यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करत झेडा का फडकविला नाही असा प्रश्न उपस्थित करत कारवाईची मागणी केली आहे.

 

जाहिरात4