स्वातंत्र्यदिनी मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते आर्या गोयथळेचा सत्कार

गुहागर | प्रतिनिधी : स्कॉलरशिप परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या गुहागर शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरची विद्यार्थिनी कुमारी आर्या मंदार गोयथळे हिचा नामदार व मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवार दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी अकरा वाजता स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर नाट्यगृह रत्नागिरी मारुती मंदिर येथे सत्कार करण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी मध्ये कुमारी आर्या मंदार गोयथळे हिने ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेत 89.33 टक्के गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत आली होती. तसेच इयत्ता आठवी मधून न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे ची विद्यार्थिनी वेदांत किरण शिवणकर हिने ८१.३० टक्के गुण मिळवून यश संपादन केले होते. म्हणून तिचा देखील यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवोदय मध्ये निवड झालेले स्वराज विक्रम शिंदे जीवन शिक्षण शाळा नंबर एक, अनिकेत अविनाश सावंत जीवन शिक्षण शाळा नंबर एक, सत्यजित जयेंद्र सानप जीवन शिक्षण शाळा नंबर 2 ,अपूर्वा मोहन पागडे जीवन शिक्षण शाळा नंबर 3 या सर्व गुहागर तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचे नामदार व मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी येथे सत्कार करण्यात येणार आहे.

जाहिरात4