गुहागरात सहा ठिकाणी चोऱ्या

गुहागर l प्रतिनिधी : गुहागरमध्ये चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. दोन रात्री 6 ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला आहे. यामध्ये 4 मंदिरातील दानपेट्या तर एका ठिकाणी गॅरेज आणि घर फोडी अशा एकूण 6 ठिकाणी चोरी झाली आहे . ही घटना बुधवार आणि गुरुवारी सलग दोन दिवस घडली . यामध्ये आरे येथील श्रीराम मंदिर , श्री दत्त मंदिर वरवेली , मराठवाडी येथील श्री हसलाई देवी मंदिर व पालशेत येथील श्री गणेश मंदिर अशा चार ठिकाणी चोरट्यांनी दानपेट्या फोडल्या . सर्व मंदिरातील गाभाऱ्यांचे टाळे फोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला . यामध्ये हसालाई मंदिरात असेलेल्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये चोरटे व्यवस्थित दिसत नाहीत . या घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी 11 ऑगस्ट रोजी चोरट्यांनी पुन्हा गुहागरातील शृंगारतळी वेळंब येथे मंगेश प्रभाकर जाधव यांचे गॅरेज फोडले . याबाबत मंगेश यांनी गुहागर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली . ते रक्षाबंधनसाठी मुंबई येथे गेले होते ते वेळंब येथे भाड्याच्या खोलीत राहतात . खोलीच्या बाजूला दुसऱ्या रूम मध्ये त्यांचे गॅरेज आहे . त्यांच्या गॅरेज मध्ये काम करणारे सूर्यकांत नवलकर हे गुरुवारी सायंकाळी गॅरेज बंद करून घरी गेले होते . मंगेश जाधव हे 12 ऑगस्ट रोजी मुंबईहुन शृंगारतळी येथे आले असता त्यांना आपल्या खोलीचा दरवाजा कडी- कोयंडा उचकटलेला दिसला . आत जाऊन पाहिले तर घरातील सिलेंडर तसेच ब्लू टूथ स्पीकर चोरीस गेला होता . त्यांनी गॅरेज मध्ये जाऊन पाहिले असता . तिथेही खोलीचे कडी कोयंडा उचकटून गाडीच्या दोन बॅटऱ्या चोरीस गेल्याचे दिसून आले . एकूण 9500 रुपयांच्या मालाची चोरी झाली आहे . जाधव यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

जाहिरात4