गुहागर तहसिलने स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचा केला गौरव

देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त गुहागर प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

गुहागर | प्रतिनिधी : देशाच्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या गुहागर तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचा गौरव करत गुहागर तहसीलने देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. देशाच्या स्वातंत्र्यचा अमृतमहोत्सव सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे.गुहागर तहसीलतर्फे देखील विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे व पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी तालुक्यातील स्वातंत्र सैनिकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियाना देशाचा ध्वज आणि शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला.यामध्ये देवघर येथील अर्जुन गोविंद चव्हाण हे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आझाद हिंद फौजेत दाखल झाले व देशासाठी लढले.केशव गोपाळ जाधव यांचे जन्मस्थळ निर्व्हाळ तर गाव गिमवी यांनी देखील स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आझाद हिंद फौजेत दाखल होऊन वेळोवेळी शिक्षा देखील भोगली.गिमवी येथील महादेव सिताराम जाधव यांनी देखील देशाच्या स्वातंत्र्यमध्ये महत्वाचे योगदान दिले आहे.तर वेळणेश्वर येथील परशुराम विनायक गोखले यांनी देखील देशाच्या स्वातंत्र्यसाठी लढा दिला. सध्या हे चारही स्वातंत्र्यसैनिक हयात नाहीत मात्र त्यांच्या कुटुंबियाना भेट देऊन देशाच्या स्वातंत्र्यच्या अमृतमहोसत्वनिमित्त गौरव करून तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांप्रती आत्मीयता दाखवून स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

जाहिरात4