सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा १६ ऑगस्ट रोजी बक्षीस वितरण समारंभ

आ. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

युवा संदेश प्रतिष्ठानचे आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी :
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा अर्थात एस टी एस २०२२ चा बक्षीस वितरण समारंभ मंगळवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे युवा नेते तथा कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे हे उपस्थित राहणार आहेत.
त्यांच्यासह माजी जिल्हा बँक संचालक विकासभाई सावंत, माजी नगराध्यक्ष संजू परब, जि.प. चे माजी शिक्षण सभापती प्रमोद कामत, माजी जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, माजी सभापती रवी मडगावकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग , गजानन गावडे, माजी जि. प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, माजी जि.प. सभापती शर्वाणी गावकर, माजी जि.प. सदस्या श्वेता कोरगावकर, उन्नती धुरी, पल्लवी राऊळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च अर्थात एस टी एस परीक्षा २७ मार्च रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या परीक्षेत जिल्हाभरातून ५२०० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचे हे ५ वे वर्ष होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १८ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती .या परीक्षेतील प्रत्येक इयत्तेतील जिल्हास्तरीय पहिल्या २५ व आठही तालुक्यातील प्रत्येक इयत्तेतील पहिल्या ३ गुणवंत विद्यार्थ्यांना २ लाख रुपयांची पारितोषिके, सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे . तसेच ६ वी व ७ वी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅब व ३ व ४ थी च्या विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते यावेळी गौरविण्यात येणार आहे.
याबाबतच्या अधिक माहितीसाठी संपर्क सुशांत मर्गज (९४२०२०६३२६) परीक्षा प्रमुख सिंधुरत्न टॅलेंट सर्च यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा माजी जि. प. अध्यक्षा सौ. संजना संदेश सावंत व युवा संदेश प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले आहे.

पुढील शैक्षणिक वर्षात युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च एसटीएस २०२३ ही परीक्षा ५ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आली असून फॉर्म वितरण सुरू करण्यात आले असल्याची माहिती ही आयोजकांकडून देण्यात आली आहे.

जाहिरात4