माजगावात सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार

अनेक ठिकाणी कोसळले वृक्ष : वाहतुक ठप्प

गाडीही रुतली : महावितरणची बत्ती गुल

सावंतवाडी । प्रतिनिधी : गेल्या काही दिवसात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला असतानाच गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे माजगाव गावात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून व तुटून पडले. यामुळे रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे ठप्प झाले आहेत.
माजगाव ग्रामपंचायत लगत एक झाड रस्त्यावर कोसळले असून यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच खोतवाडा परिसरात अन्य दोन झाडेही कोसळली आहेत. त्याचप्रमाणे माजगाव खालची आळी व अन्य भागातही वृक्ष उन्मळून पडले आहेत. माजगाव खोत वाडा येथील मूर्तिकार काका सावंत यांच्या मांगरावर झाड कोसळून नुकसान झाले.
या पार्श्वभूमीवर एका ठिकाणी झाड कोसळून रस्त्यावर तयार झालेल्या चरात माजगाव येथे आलेल्या एका व्यक्तीची चार चाकी गाडी रुतून बसली. सुदैवाने या अपघातात कोणालाही कसलीही इजा झाली नाही. मात्र गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले.
वादळ स्वरूपात आलेल्या या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजवाहिन्यावर वृक्ष तसेच फांद्या पडल्यामुळे महावितरणची बत्ती ही गुल झाली आहे. त्यामुळे माजगाव परिसरात काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. एकंदरीतच काही काळ आलेल्या या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे माजगाव गावातील पूर्णतः जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सावंतवाडी रेडी राज्य मार्गावरील मळगाव घाटीत देखील चार ते पाच झाडे उन्मळून पडली आहेत.यामुळे एक मार्गी वाहतूक सुरू आहे. तालुक्यात अन्य काही ठिकाणी देखील या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे पडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तर यामुळे अनेक ठिकाणी बत्ती देखील गुल झाली आहे.

जाहिरात4