देवगड-टेंबवली कालवी येथे दोन किलो गांजा जप्त ; एकजण ताब्यात

सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेक्षण विभागाची कारवाई 

देवगड : तालुक्यातील टेंबवली कालवी येथे दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेक्षण विभागाने हि कारवाई केली. या प्रकरणी संतोष भास्कर पारकर याला ताब्यात घेण्यात आले आहे.
बुधवारी १०ऑगस्ट रोजी दु.१.३५ वा हि कारवाई करण्यात आली.

याबाबतची अधिक माहिती अशी कि
तालुक्यातील टेंबवली कालवी येथील संतोष भास्कर पारकर  गैरकायदा गांजा सदृश्य अमली पदार्थ जवळ बाळगून विक्री करतो अशी खबर सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेक्षण शाखेला मिळताच त्यांनी टेंबवली कालवी येथे छापा टाकून सुमारे २ किलो १५८ ग्रॅम एवढा सुमारे ६३ हजार रुपये किमतीचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ जप्त करून त्यांचेकडून एक चिलीम व एक हजार रुपयांचा मोबाईल हँडसेट ताब्यात घेतला आहे या घटनेची खबर संकेत खाडये यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा अन्वेक्षण विभाग सिंधुदुर्ग यांनी पेट्रोलिंग करीत असताना टेंबवली कालवी या भागात गांजा विक्री केली जाते अशी खबर मिळाली त्यानुसार त्यांनी टाकलेल्या छाप्यात दोन पिशव्या मध्ये ६७ छोट्या प्लास्टिक पिशव्यामध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ सापडला तो जप्त करण्यात आला.यावेळी श्वान पथक ला पाचारण करण्यात आले होते. या मोहिमेत स्थानिक गुन्हा अन्वेक्षण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे समवेत सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग,पोलीस उपनिरीक्षक आर.बी शेळके पोलीस हवालदार पी.एस.कदम,के.ए.केसरकर,ए.ए.गंगावणे,पो.ना.ए ए तेली,पो .कॉ आर .एम.इंगळे,यांनी सहभाग घेतला या घटनेतील संशयित आरोपी संतोष भास्कर पारकर याचे विरुद्ध अधिनियम १९८५ चे कलम ८(क),२०(ब)दोन (ब)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे करीत आहेत.

जाहिरात4