झोंबडी,कौंढर काळसुर गावच्या विद्यार्थी एसटी फेऱ्या नियमितपणे सुरू करा

गुहागर मनसेची गुहागर आगारावर धडक

गुहागर | प्रतिनिधी : २ वर्षाच्या कोरोना महामारी संसर्गाच्या कालखंडानंतर नवीन शैक्षणिक हंगामात गुहागर तालुक्यामधील मराठी, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, विविध विषयांचे कोर्सेस हे गुहागर तालुक्यात नियमितपणे सुरू झाले. २ वर्षानंतर हे शैक्षणिक पर्व सुरू होत असताना यामध्ये मोठी अडचण ठरत होती ते गुहागर तालुक्यातील एसटी आगराच्या विद्यार्थ्यांसाठीच्या एसटी फेऱ्यांचा तुटवडा. यामुळे विद्यार्थ्याचे शिक्षणाचे नुकसान होत होते याबाबत गुहागर तालुक्यातून कौंढर काळसुरमधून आवाज उठत होता ही गोष्ट लक्षात येताच गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि या संदर्भातील निवेदनही दिले. कौंढर काळसुर विद्यार्थ्यांच्या या अडचणीबाबत आगार व्यवस्थापकांशी चर्चा करत लवकररात लवकर बस सेवा चालू करा व विद्यार्थ्यां विषयीची तळमळ,आस्था गुहागरआगार व्यवस्थापक ,स्थानकप्रमुख यांना लेखी निवेदन सादर करून मांडली. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर ,विक्रम जोयशी,किशोर बामणे, तेजस पोपळे,सागर शिरगावकर, विवेक शिर्के, प्रसाद विखारे, आणि कौंढर काळसुर गावचे विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात4