मंडणगड तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार

दोन दिवसाच्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे शनिवारी सकाळपासून सुरू झालेली पावसाचे संत धार रविवारी व सोमवारी कायम सुरू होती दिनांक 7 ऑगस्ट 2022 पर्यंत मंडळ तालुक्यात एकूण 2184 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे यावर्षीच्या हंगामात तालुक्यात सरासरी 200 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी 800 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे रविवारी दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे जिल्हा परिषद शाळा घुमरी या शाळेचे छत कोसळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे घुमरी या गावी इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे 9 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत निसर्ग चक्रीवादळात ही शाळा क्षितिग्रस्त झाली होती त्या वेळेपासून शाळेतील विद्यार्थी गेली दोन वर्ष गावातील चावडी मध्ये शिक्षण घेत आहेत रविवारी झालेल्या पावसाच्या संसदधारीमुळे शाळेवरील छत कोसळले आहे याचबरोबर तालुक्यातील भारजा नदी मध्ये क्षमतेपेक्षा अधिक पाणी वाढले होते त्यामुळे मंडणगड मांदिवली मार्गावरील चिंचघर पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटून वाहतूक व्यवस्था कोलमडली होती त्या परिसरातील भात शेती पूर्णपणे पाण्याखाली आली होती तसेच कोंबळे येथील तिडे मोरी वरून पाणी वाहून जात असल्याने काही काळ वाहतूक व्यवस्था कोलमडली होती या ठिकाणी तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच तालुक्यातील आंबवणे बुद्रुक रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद पडला होता या वेळेला तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन तत्काळ घटनास्थळी जाऊन सार्वजनिक बांधकाम मंडळ यांचे पथक व मंडणगड पोलीस स्थानकाचे पथक घटनास्थळी जाऊन दरड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला तर आज दुपारपर्यंत समर्थ नगर येथील काही घरांच्या संपर्क रस्त्यावर पाणी साचल्यामुळे तुटला होता

जाहिरात4