गुहागर Breaking : अंजनवेल येथील बेपत्ता 3 अल्पवयीन बहिणींना रत्नागिरी पोलिसांनी अवघ्या 12 काढले शोधून

मुलींना घेऊन जाणाऱ्या दोघा महिलांना त्यांच्या 4 मुलांसह घेतले ताब्यात 

रत्नागिरी | प्रतिनिधी 

मौजे अंजनवेल ता. गुहागर येथुन बेपत्ता ३ अल्पवयीन मुलींना १२ तासात शोधण्यास गुहागर पोलीसांना यश आले आहे. मुबंई येथुन घेतले सुखरुप ताब्यात घेतले आहे.

दि . ०५/०८/२०२२ रोजी गुहागर तालुक्यातील अरमारकर मोहल्ला , अंजनवेल येथील राहणारी सौ. गजाला फैयाज महालदार यांच्या ३ अल्पवयीन मुली प्रत्येकी वय १७ वर्षे , १३ वर्षे , ११ वर्षे यांना मोहल्यात राहणा-या अफिया सुलतान अन्सारी व अरविना सुफियार पांजरी या महिलांनी सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास, आम्हाला अजंनवेल येथील डॉक्टरांकडे जायचे असल्याचे सांगुन सौ. गजाला यांच्या ३ मुलींना सोबत घेवुन गेल्या. मात्र तिनही अल्पवयीन मुली परत न आल्याने मोहल्यात इतरत्र शोध घेतला तसेच डॉक्टरांकडेही चौकशी केली तेव्हा सदर महिला व मुली हॉस्पीटल मध्ये गेल्या नसल्याचे समजले.

सौ.गजाला महालदार यांनी रात्री १२.०० वाजेपर्यंत वाट पाहुन आपल्या अल्पवयीन मुली घरी परत आलेल्या नसल्याने व सदर दोन्ही महिलांशी संपर्क क्रमांक बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नव्हता . त्यावेळी ३ मुलींसोबत असलेल्या दोन्ही महिलांचे स्वतःची प्रत्येकी २ मुले असे एकुण ४ मुले अनुक्रमे वय ९ वर्षे , ६ वर्षे , १ वर्षे , १ महिना या सुध्दा त्यांचे समवेत असल्याचे समजले . सदर माहिती गुहागर पोलीसांना प्राप्त होताच सदर घटनेत एकुण ७ बालक व २ महिला बेपत्ता असल्याचे गंभीर बाब निदर्शनास आल्याने मा.पोलीस अधीक्षक डॉ . मोहितकुमार गर्ग रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली व उपविभागिय पोलीस अधिकारी सो चिपळुण यांचे सुचनेप्रमाणे शोध घेणेकामी गुहागर पोलीस ठाण्याचे २ अधिकारी व ८ अमंलदार यांचे ४ पथके तयार केली , प्रत्येक पथकाला १ ) दापोली , २ ) दाभोळ , ३ ) चिपळुण , ४ ) मुबंई येथे वेगवेगळी कामगिरी सपोनि तुषार पाचपुते यांनी सोपवली .

घटणेच्या गांभीर्याप्रमाणे क्षणाचा विलंब न करता सविस्तर तपास केला . सदर महिला या सर्व बालकासहित मुबंईच्या दिशेने जाण्याची शक्यता असल्याने त्या प्रमाणे वेळ न घालवता पोउनि कांबळे यांचे पथकाला तात्काळ मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले होते . इतर पथकाने केलेल्या तपासामध्ये सदरच्या महिला व ७ बालके हे मुंबईच्या दिशेने गेल्याचे निष्पन्नं झाले . घटनाक्रम व वेळेची सांगड घालत गुहागर पोलीसांनी सदर दोन्ही महिला व ७ बालके यांना दादर येथुन सुखरुपरित्या ताब्यात घेतले आहे .

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक सो डॉ मोहितकुमार गर्ग , अपर पोलीस अधीक्षक सो श्रीमती जयश्री देसाई , उपविभागिय पोलीस अधिकारी सोो सचिन बारी यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि पवन कांबळे , पोहेकॉ / ५७३ हनुमंत नलावडे , पोना / ४७० राजेश धनावडे , पोकॉ / ९ ६२ वैभव ओहोळ , टॅबचे रमिझ शेख यांचे पथकाने केले आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि तुषार पाचपुते हे करत आहेत .

जाहिरात4