तुळस येथे घराच्या छपरावर आलेला कोब्रा जातीचा सापाला जीवदान

सर्पमित्र महेश राऊळ यांनी त्याला शिताफीने पकडले

वेंगुर्ले : प्रतिनिधी
तालुक्यातील तुळस गावातील संजय घारे यांच्या घराच्या छपरावर आलेला कोब्रा जातीचा साप रात्रीचे 8.30 वाजण्याच्या सुमारास बाहेर पाऊस पडत असताना सर्पमित्र महेश राऊळ यांनी वर चडून शिताफीने त्या सापाला पकडले आणि नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले.
घारे यांच्या घरातील एकाला घराच्या पाष्टावर काहीतरी सरपटनारे जनावर असल्याचे दिसले,त्यामुळे घरातील सर्व मंडळी घाबरली कारण साप वर होता. घरात लहान मूल होती रात्रिची वेळ होती, पाऊस पड़त होता. तत्काळ एकाने सर्पमित्र राऊळ यांना फोन करून बोलाविले.
महेश राऊळ काही वेळात त्या घरी आल्यावर वर बघितल असता कोब्रा जातीचा साप असल्याचे त्यांनी ओळखले. तो साप पाष्टात असल्यामुळे घरामधून वर चढणे शक्य नव्हते आणि बाहेरून घरावर चढायचं तर काळोख, पाऊस, छप्पर ओले आणि कौलांना शेवाळ धरलेला असल्याने धाडसाचे होते. तरी महेश राऊळ हे हातात बरणी, टॉर्च, आणि सेफ्टी स्टिक घेऊन वर चढले. आणि स्वतःला सांभाळत सापाला पकडले आणि अनुभवाच्या जोरावर सापाला सुरक्षित बरणीत घातले आणि खाली उतरून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दीले. राऊळ यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात4