श्री. प पु. राऊळ महाराज व श्री. प पु. अण्णा महाराज समाधी मंदिरात ८ ऑगस्ट रोजी जाया पूजेचे आयोजन

कुडाळ | प्रतिनिधी : दुसऱ्या श्रावणी सोमवारी दि. ८ ऑगस्ट रोजी श्री. प पु. राऊळ महाराज व श्री. प पु. अण्णा महाराज समाधी मंदिरात जाया पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्गात प्रथमच होणाऱ्या या जाया पूजनाचे स्वरूप म्हणजे सुमारे पाच लाख जाईच्या (चमेली )च्या फुलांनी दोन्ही समाधी मंदिरे गाभारे सजविले जातील. सकाळी गौरीशंकर मंदिरात दुग्धभिषेक करून कार्यक्रमाची सुरवात होईल.पादुका पूजन दुपारी आरती, महाप्रसाद जाया पूजा तसेच दुपारी २.३० वाजता सत्यनारायण महापूजा,तसेच सांजारती आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी कृपया भाविकांनी तीर्थप्रसाद महा प्रसाद व पूजनाचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री. प पु राऊळ महाराज सेवा ट्रस्टचे कार्याध्यक्ष विठोबा विनायक (अण्णा )राऊळ यांनी केले आहे.

जाहिरात4