त्रिंबक येथील आजारी महिलेसाठी निलेश राणे यांचा मदतीचा हात…

उपचारानंतर त्या महिलेच्या कुटुंबीयांनी मानले निलेश राणे यांचे आभार

मालवण : भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या दातृत्वाचा अनुभव त्रिंबक येथील वायंगणकर कुटुंबीयांनी अनुभवला. कर्करोगाने ग्रस्त मालवण तालुक्यातील त्रिंबक वायंगणी येथील मीना दिलीप वायंगणकर या महिलेला भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या पुढाकारातुन मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर संबंधित महिलेसह तिच्या कुटुंबीयांनी निलेश राणेंच्या अंधेरी येथील कार्यालयात भेट घेत त्यांचे आभार मानले.

आजारी महिलेची माहिती मिळाल्यानंतर तिला वैद्यकीय मदत देण्याचे निलेश राणेंनी आश्वाशीत केले होते, त्यानुसार “देऊ शब्द तो पूर्ण करू” या धर्तीवर राणे कुटुंबियांकडून लाखो रुपये मदतीचा हात देण्यात आला आहे. मालवण तालुक्यातील त्रिंबक वायंगणी गावामधील मीना दिलीप वायंगणकर या कुटुंबातील स्त्रीला स्तनाचा कँसर झाल्याने केमोथेरपीची आवश्यकता होती. यासाठी मुंबईतील जसलोक हाॅस्पीटल मध्ये पूर्ण सहकार्य ८ महिने चाललेले ८ केमोथेरपी पूर्ण करण्यात आले. वायंगणकर कुटुंबातील सदस्यांनी अंधेरी येथील सिंधुदुर्ग भवन येत निलेश राणे यांची सदिच्छा भेट घेऊन आभार मानले. यावेळी अरविंद सावंत, चंद्रशेखर राणे आदी उपस्थित होते.

जाहिरात4