आझादी का अमृतमहोत्सव तहसिल कार्यालय व शिक्षण संस्थाकडून शहरातून जनजागृती रँली

मंडणगड | प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव घर घर तिरंगा अभियानाचे माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. मंडणगड तहसिल कार्यालयाचेवतीने 13 ते 15 ऑगस्ट 2022 या तीन दिवसात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची तालुक्यातील जनतेस माहीती व्हावी या उद्देशाने 6 ऑगस्ट 2022 रोजी मंडणगड शहरातून जनजागृती रँली काढण्यात आली. या रँलीत तहिसल कार्यालय मंडणगड, नगरपंचात मंडणगड, पंचायत समिती कार्यालय मंडणगड, पोलीस स्थानक मंडणगड, लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालय, डॉ. बाबसाहेब आंबेडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, नुतन विद्यामंदिर मंडणगड येथील विद्यार्थी शिक्षक कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. शहर परिसरातून देशभक्तीपर गीत गायन करणारा रथ फिरवून व घोषणा देत तीन दिवसात नागरीकांनी भाग घ्यावयाच्या कार्यक्रमांची माहीती देण्यात आली. एस.टी. बसस्थानक परिसरात रँलीची सुरुवात झाली पाट रोड, दुर्गवाडी, अशा विविध प्रभागातून रँलीचा समारोप बसस्थानक परिसरात करण्यात आला. यावेळी बोलताना तहसिलदार दत्तात्रेय बेर्डे यांनी तीन दिवसांत करावयाचे कार्यक्रम व ध्वज संहीता यांची माहीती दिली. ध्वज संहितेचे पालन करीत घर घऱात तिरंगा फडकविण्याचे आव्हान या निमत्ताने केले. यावेळी मुख्याधिकारी विनोद दवले, प्रभारी गटविकास अधिकारी विशाल जाधव यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी नगराध्यक्षा अँड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, प्राध्यापक हुनंत सुतार, मनोज मर्चंडे,तलाठी एम.वाय मोरे, मनोज मर्चंडे यांच्यासह प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात4