इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज तळवलीच्या विद्यार्थ्यांची घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत जनजागृती फेरी

गुहागर | प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज तळवलीच्या विद्यार्थ्यांनी गावातून जनजागृती फेरी काढली. सध्या संपूर्ण देशभरात घरोघरी तिरंगा अभियान राबविले जात असून या अभियानाची जनजागृती शाळा महाविद्यालये यांमधून देखील केली आहे. गुहागर तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज तळवलीमधील विद्यार्थ्यांनी वंदे मातरम,भारत माता की जय, माझा तिरंगा माझा अभिमान, माझे घर माझी शान माझा तिरंगा माझा अभिमान अशा स्वातंत्र्यावर आधारीत घोषणा दिल्या व तळवली हायस्कूल पासून तळवली हॉस्पिटल स्टॉपपर्यंत जनजागृती फेरी काढली. यावेळी गावातील नागरीकांनी स्वयंप्रेरणेने हर घर तिरंगा अभियानात सहभागी होऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आवाहन करण्यात आले. या जनजागृती फेरी वेळी प्राचार्य बी. ए. थरकार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते व प्रा.अमोल जड्याळ,सहकारी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम शाळेत आयोजित करण्यात आले आहेत.

जाहिरात4