कोकण रेल्वेत मोबाईल चोरणारा चोरटा सावंतवाडीत ताब्यात

कोकण रेल्वेमध्ये सध्या मोबाईल चोरट्याचा सुळसुळाट झाला असून, गुरुवारी गोव्याकडे जाणाऱ्या एरणाकुलम रेल्वेत मोबाईल चोरट्याला रंगेहाथ पकडून सावंतवाडी रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. हा मोबाईल चोरटा उत्तर प्रदेशातील असून गोव्या कडे जात होता.

कोकण रेल्वेत सध्या मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून अनेकांचे मोबाईल चोरट्यांनी हातोहात लंपास होत आहे. अशातच एरणाकुलम मधून प्रवास करणाऱ्या सावंतवाडीतील एका युवकाचा मोबाईल रत्नागिरी जवळ चोरीला गेला. त्यावेळी या युवकांनी शोधाशोध केली असता त्याच डब्यात उत्तर प्रदेशातील एक युवक बसला होता. त्याच्यावर संशय आल्याने झाडाझडती घेण्यात आली असता मोबाईल त्याच्या जवळ आढळून आला. त्यानंतर युवकास सावंतवाडीत आणून रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

जाहिरात4