अनधिकृत वाळू वाहतूक डंपर कोळंब मार्गावर पकडला

आचरा महसूल पथकाची कारवाई ; डंपर मालवण तहसील कार्यालयात जमा

मालवण : अनधिकृत वाळू वाहतूक विरोधात मालवण महसूल पथकाची धडक कारवाई सुरूच आहे. तहसीलदार अजय पाटणे यांनी विविध मार्गावर कारवाई पथकांची नियुक्ती केली आहे. शुक्रवारी आचरा मंडळ अधिकारी अजय परब यांच्या नेतृत्वाखाली महसूल, पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने कोळंब मार्गावर कारवाई केली.

आचरा मालवण मार्गावरून अनधिकृत वाळू वाहतूक करणारा एम एच ३१ इ एन ०७०९ हा डंपर पकडला. वाळू वाहतुक बाबत कोणताही पास नसल्याने सदर डंपर पुढील कारवाईसाठी मालवण तहसील कार्यालय येथे आणण्यात आला आहे.

आचरा मंडळ अधिकारी अजय परब, तलाठी योगेश माळी, संतोष जाधव तलाठी, अनिल काळे, ए. के. देसाई, प्रीतम भोगटे, यू. एन. पाटील, पोलीस कर्मचारी सरकुंडे, आचरेकर व अन्य कर्मचारी कारवाई पथकात सहभागी होते. अशी माहिती मालवण महसूल विभागाकडून देण्यात आली.

जाहिरात4