सोशल मीडियाचा वापर मर्यादित व काळजीपूर्वक करावा – पोलीस निरीक्षक सौ. शैलजा सावंत

मंडणगड | प्रतिनिधी : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मंडणगड नगरपंचायत याच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. धनपाल कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘सायबर गुन्हेगारी व कायदा’ या विषयावर मंडणगड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सौ. शैलजा सावंत यांनी तर ‘किशोवयीन मुलींचे आरोग्य व समस्या’ या विषयावर श्रध्दा हॉस्पीटलच्या डॉ. ज्योती लोखंडे -वडजकर यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून मंडणगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. सोनल बेर्डे, मंडणगड नगरपंचायतचे मुख्यधिकारी विनोद डवले हे उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे संचालक आदेश मर्चंडे, नगरसेविका सौ. रेश्मा मर्चंडे, सोवेली येथील भारवी दळवी, डॉ. भरतकुमार सोलापुरे, डॉ. शामराव वाघमारे, क्रीडा विभागप्रमुख डॉ. मुकेश कदम प्रा. अशोक कंठाळे मंडणगड नगरपंचायतीचे मनोज मर्चंडे, विकास साळवी, संदीप डिके, निलेश लेंडे, स्नेहा सापटे, किरण साखरे, सूरज कदम, प्रकाश करावडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी प्रा. हनुमंत सुतार यांनी उपस्थितांचे स्वागत करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक सौ. शैलजा सावंत म्हणाल्या की, आज समाजात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात होताना आपण पाहतो. म्हणून सोशल मीडियाचा वापर मर्यादित व काळजीपूर्वक करावा.

अनोळखी फोन आल्यास त्याला बळी न पडता म्हणजेच आपली माहिती न देता ते टाळले पाहिजे म्हणून शक्यतो अतिशय सावधानता बाळगून असे व्यवहार करावेत, बॅुका, बीएसएनएल, एमएसइबी, लॉटरी, गुंतवणूक करा, बक्षीस लागले आहे, अशा पध्दतीने आलेल्या मेसेजला बळी पडू नका, सुरक्षिततेच्या दृश्टिकोनातून आपली वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर अजिबात शेअर करता कामा नये, आपले पासवर्ड, ए.टी.एम पिन आदी सतत बदलत राहिले पाहिजे, चुकीचे मेसेज फारवर्ड करणे किवा काही प्रलोभने दाखविणे किंवा एखादी लिंक डाऊनलोड करण्यास सांगणे किवा ओटीपी शेअर करायला सांगणे अशा गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत, अन्यथा आपले न भरून निघण्यासारखे नुकसान होऊ शकते. वेळीच सावध झाले पाहिजे. सायबर गुन्हेगारीवर प्रतिबंध हाच एकमेव उपाय आहे. एकूण सोशल मीडियाचा वापर मर्यादित केला पाहिजे. चुकून काही घडल्यास पोलीस स्टेशनशी त्वरित संपर्क साधावा. असे त्यांनी सांगितले.

डॉ. ज्योती लोखंडे यांनी मुलींच्या आरोग्य व समस्याबद्दल मार्गदर्शन करताना म्हणाल्या की. मुलींनी आपल्या आरोग्याबद्दल जागरुक राहणे गरजेचे आहे. आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे व उद्भवणाऱ्या समस्यांकडे आपले बारकाईने लक्ष असले पाहिजे. आपले शरीर निरोगी ठेवायचे तर संतुलीत आहार घेणे, नियमीत व्यायाम करणे, फास्ट फुडचा अतिरेक टाळणे इत्यादीबददल त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. घरातील कामे करत असताना स्त्री आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असते. त्यामुळे त्यांना आपल्या अरोग्याविषयी अनेक समस्यांना तोंड दयावे लागते. त्याकरिता महिलांनी आपल्या घराबरोबरच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे देखील आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ. धनपाल कांबळे म्हणाले की, ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांना बिलकूल कायदाचा धाक राहिलेला नाही. चांगले सुशिक्षित, नोकरदार याला बळी पडतात तर सामान्यांचे काय? म्हणून आज समाजात ऑनलाईन फसवणुकीसंदर्भात जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःचा मोबाईल नंबर शक्यतो कोणाला शेअर करू नये. आलेला अनोन नंबर घेऊ नये. एवढे जरी आपल्या हातून घडले, आपले होणारे नुकसान टाळता येते. असे त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे संचालक आदेश मर्चंडे व मंडणगड नगरपंचायतचे मुख्यधिकारी विनोद डवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ‘हर घर तिरंगा’ च्या निमित्ताने आयोजित सर्व उपक्रमांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपाहार देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन.एस.एस कार्यक्रमाधिकारी प्रा. शरिफ काझी, प्रा. हनुमंत सुतार, क्रीडाविभागप्रमुख डॉ. मुकेश कदम व नगरपंचायत मंडणगडचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनोदकुमार चव्हाण यांनी तर शेवटी आभार प्रा. शरिफ काझी यांनी मानले.

जाहिरात4