डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मायक्रोसाॉफ्ट ऑफिसवर कार्यशाळा संपन्न

मंडणगड । प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठ संचलित, विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागामार्फत महाविद्यालयाच्या दशकपूर्तीचे औचित्य साधून महाविद्यालयात मायक्रोसाॉफ्ट ऑफिस या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उदघाटन महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अंशुमन मगर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यशाळेविषयी मार्गदर्शन करताना डॉ. अंशुमन मगर म्हणाले की, “आपण सर्व संगणक साक्षर आहोतच परंतु व्यावसायिक शिक्षणाच्या विद्यार्थीना मायक्रोसाॉफ्ट वर्ड, एक्सेल, पावर पॉईण्ट प्रेझेन्टेशन यांचा परिणामकारक वापर करावा लागतो. ही कौशल्ये तुम्ही आत्मसात करावी या उद्धेशाने ही कार्यशाळा आयोजित केली आहे” सदर कार्यशाळेचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. मायक्रोसाॉफ्ट पावर पॉईण्ट प्रेझेन्टेशन वर सहा. प्रा. राजेंद्र राऊत, मायक्रोसाॉफ्ट एक्सेल वर सहा. प्रा सायली घाडगे तर मायक्रोसाॉफ्ट वर्ड विषयी सहा. प्रा. मंगेश ठसाळे यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभले.

सदर कार्यशाळेचे नियोजन सहा. प्रा. सायली घाडगे, सहा. प्रा. अमोल राजेशिर्के व अरुण ढंग यांनी केले. या कार्यशाळेस सर्व शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात4