मोबाईल लिंकद्वारे रत्नागिरीतील महिलेच्या बँक अकाऊंटमधून ८ लाख ८५ हजार रुपये काढणारा लातूर येथील तरुण जेरबंद

रत्नागिरी । प्रतिनिधी

मोबाईल लिंकव्दारे रत्नागिरीतील फेडरल बँकेत खाते असलेल्या महिलेच्या नावाचे परस्पर क्रेडिट कार्ड प्राप्त करुन सुमारे 8 लाख 85 हजार 29 रुपयांची फसवणूक करणार्‍या संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली.सोमवारी न्यायालयाने त्याला 4 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.ही घटना 25 मार्च 2022 ते 14 जून 2022 या कालावधीत मारुती मंदिर येथील फेडरल बँकेत घडली आहे.

गोपाळ भुजंगराव जाधव (28, सध्या रा.आंबेजोगाई रोड शिवाजीनगर लातूर मुळ रा.निरपण्णा, बिड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात बँकेचे मॅनेजर सुमित विश्वनाथ बागडिया (35, रा.आरोग्य मंदिर, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली होती.त्यानुसार,त्यांच्या बँकेत सायली सचिन पाटील (रा. चिंचखरी, रत्नागिरी) यांचे खाते आहे. त्यांच्या खात्याला लिंक असलेला मोबाईल क्रमांक हा सध्या लातूर येथील अज्ञात वापरत आहे. त्याव्दारे त्याने सायली पाटील यांच्या नावाचा क्रेडिट कार्डचे लिंक व्दारे पत्ता बदलून तो स्वतःचा लातूर येथील अशोक हॉटेल अमृता ट्रॅव्हल्स असा केला. तसेच त्याने सायली पाटील यांचे खाते असलेल्या फेडरल बँकेकडे मोबाईल लिंकव्दारे मागणी करुन सायली पाटील यांच्या नावाचे क्रेडिट कार्ड प्राप्त केले.त्यानंतर वेळोवेळी लातूर येथे एकूण 8 लाख 85 हजार इतकी रक्कम काढून अपहार करत बँकेची फसवणूक केली होती.

जाहिरात4