गर्भवती महिलेला मारहाण केल्यामुळे सहा महिन्याचे अर्भक दगावले

मंडणगड | प्रतिनिधी

तालुक्यातील म्हाप्रळ येथील महिलेला पाच ते सहा जणांकडून मारहाण झाल्यामुळे तिचे सहा महिन्याचे बाळ दगावल्याची घटना मंडळ तालुक्यात घडले आहे.

या संदर्भात मंडणगड पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार मरियम डावरे (वय वर्ष 34, रा. नवानगर म्हाप्रळ मोहल्ला) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 1 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास ही फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या फिर्यादीमध्ये डावरे यांनी म्हटले आहे की म्हाप्रळ येथील फुरकान मुकादम, त्याची आई नाव माहित नाही,जहूर मुकादम, हसमत काजी, फैजान मुकादम, अब्बास मुकादम या सहा जणांनी दिनांक 23 जुलै 2022 रोजी म्हाप्रळ येथे त्यांना मारहाण केली. या वेळेला मर्यम यांच्या पोटावर देखील मारहाण केली. त्या सहा महिन्याच्या गर्भवती असल्याने त्यांना त्याचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे सहा महिन्याचे बाळ दगावले आहे.

या संदर्भात मंडणगड पोलीस स्थानकात संबंधिताविरोधात भादवी कलम 141, 143, 149, 315, 316, 504, 506, 354 ( ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक शैलाजा सावंत करीत आहेत

जाहिरात4