नानांनी केलेली कामे आदर्शवत- प्रकाश कारेकर

गुहागर | प्रतिनिधी : नाना शंकरशेठ यांचे कार्य महान आहे.नानांनी केलेली कामे आदर्शवत आहेत तसेच ती लोककल्याणकारी आहेत त्याचे भान आपण ठेवले पाहिजे असे प्रतिपादन गुहागर दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष प्रकाश कारेकर यांनी केले.गुहागर तालुका दैवज्ञ समाजाच्यावतीने साखरीआगर येथे आयोजित केलेल्या नाना शंकरशेठ पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की नानांनी आपले आयुष्य जनतेसाठी घालवले,सतीची चाल बंद करणे यासाठी ते सर्वप्रथम पुढे राहिले तसेच 1857 मध्ये त्यांनी क्रांतिकारकांना आश्रय दिला.मात्र नानांचे हे कार्य सर्वांसमोर आणण्यात आपण कमी पडलो अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी गुहागर तालुका दैवज्ञ समाजाच्यावतीने जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांच्या प्रतिमेला अध्यक्ष प्रकाश कारेकर यांनी पुष्पहार अर्पण केला.यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्रकाश कारेकर,सुभाष अडूरकर,दीपक पालशेतकर, किरण वैद्य, अमोल पोवळे,राहुल सैतवडेकर, आशिष कारेकर,पूजा कारेकर,वीणा सैतवडेकर आदी तालुक्यातील ज्ञाती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात4