मुरुगवाडा येथे बेकायदेशीर गावठी दारू बाळगल्याप्रकरणी एकावर कारवाई

रत्नागिरी |  प्रतिनिधी
शहरातील मुरुगवाडा येथे बेकायदेशिरपणे आपल्या ताब्यात गावठी हातभटटीची 250 रुपयांची 5 लिटर दारु बाळगल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई गुरुवार 28 जुलै रोजी सायंकाळी 7.40 वा.करण्यात आली.
अनुप सदाशिव गिरकर (36,रा.मुरुगवाडा,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.याबाबत महिला पोलिस नाईक रिशिता गावकर यांनी तक्रार दिली असून अधिक तपास पोलिस हवालदार पालांडे करत आहेत.

जाहिरात4