अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या आरोपाखाली सरंबळ येथील दाम्पत्याला सश्रम कारावासाची शिक्षा

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

अल्पवयीन मूलीवरील बलत्कार प्रकरणी सरंबळ येथील दाम्पत्याला विशेष जिल्हा न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. दत्ताराम उर्फ भाई कृष्णा भोवर याला 20 वर्ष सश्रम कारावास तर गुन्ह्याची माहिती लपवून म्हणून त्याची पत्नी सुशीला उर्फ आशाताई कृष्णा भोवर हिला तीन महिने सश्रम कारावासाची व दंडाची शिक्षा या न्यायालयाने दिली. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता अँड. रुपेश देसाई यानी काम पाहिले.

अल्पवयीन मुलीवर १० मार्च २०२० रोजी बलात्कार झाल्याची घटना घडली होती. बालकांचे लैंगिक शोषण व बलात्कार याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी वरील पतीपत्नीविरोधात कुडाळ पोलिसांनी दोषारोपपत्र ठेवले होते. त्यानुसार या न्यायालयांसमोर सुनावणी झाली दहा साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये प्रयोगशाळेचा अहवाल महत्त्वपूर्ण ठरला व साक्षीदारांच्या साक्षी आरोपींना शिक्षेपर्यंत नेऊ शकल्या. पंच, वैद्यकीय अधिकारी, तपासीक अधिकारी पीडित मुलगी आदींच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

या गुन्ह्यात तपासी अंमलदार गायत्री पाटील यांनी तपासणार केले होते त्यांची साक्षही महत्त्वपूर्ण ठरली. आरोपी दत्ताराम उर्फ भाई कृष्णा भोवर याला भा. दं. वि. कलम 376 (ए, बी) कलमान्वये 20 वर्ष सश्रम कारावास, 2 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 20 दिवसाची साधी कैद. पोक्सो कायद्यांतर्गत कलम 4 अन्वये 10 वर्षे सश्रम कारावास, 2 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 20 दिवसाची साधी कैद. पोक्सा कायद्यांतर्गत कलम 8 अन्वये 3 वर्षे सश्रम कारावास, 3 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवसाची साधी कैद. पोक्सो कायद्यांतर्गत कलम 10 अन्वये 5 वर्ष सश्रम कारावास, 1500 रू. दंड व दंड न भरल्या 15 दिवस साधी कैद.तर पत्नी सुशीला उर्फ आशाताई कृष्णा भोवर हिला पोक्सो कायद्यान्वये 3 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान पोलिस उपनिरिक्षक मुल्ला, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विष्णू नाईक, पोलिस हवालदार माfल्लकार्जुन ऐहोळे, माfहला पोलिस हवालदार सिद्धी वेंगुर्लेकर यंानी मदतनिस म्हणून काम पाहिले.

जाहिरात4