पेंडूर सरपंच पद रद्द प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशाला ग्रामविकास विभागाकडून स्थगिती

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर ग्रामपंचायतीचे सरपंच गितांजली गुंडू कांबळी यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३ कलम ३९(१) अन्वये पेंडूर ग्रामपंचायत सरपंच पदावरून तसेच ग्रामपंचायत सदस्य पदावरून काढून टाकण्यात आल्याचे कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी दि. २० जून २०२२ च्या आदेशाने जाहिर केले होते. दरम्यान या आदेशाला ग्रामविकास विभागा कडून पुढील सुनावणी पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिव निला रानडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

वेंगुर्ले गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत अधिनियम कलम ३८ व महाराष्ट्र ग्रामपंचायत तपासणी आणि कागदपत्रांची तपासणी त्यांचा शोध नियम १९६३ मधील ४(२) मधील तरतुदीचे उल्लंघन केल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत असल्याने त्यांच्या विरूध्द महाराष्ट्र कारवाई करण्याबाबत प्रस्ताव सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविला होता. यानुसार ग्राम रोजगार सेवक यांचे मानधन प्रकरणी नियमाचे उल्लंघन ककरणे. तसेच ग्रापंचायत नमुना नं.८ सन ६७-६८ चा इमारत क्रमांक ५१७ चा उतारा चुकीचा देत कर्तव्यात कसुर केलेली आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीचे सरपंच गितांजली कांबळी याना पेंडूर ग्रामपंचायत सरपंच पदावरून तसेच ग्रामपंचायत सदस्य पदावरून काढून टाकण्यात आल्याचे आदेश विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी काढले होते.

दरम्यान कोकण विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या आदेशा विरुद्ध सरपंच गीतांजली कांबळी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ३९ (३) नुसार ग्रामविकास मंत्र्यांच्या न्यायालयामध्ये अपील दाखल केले आहे. त्यामुळे सरपंच यांच्या विरोधात कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला ग्रामविकास मंत्र्यांनी स्थगितीचे आदेश दिले आहेत. या प्रकारणाची सुनावणी तारीख लवकरच कळवण्यात येईल असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जाहिरात4