विजयदुर्ग : दोन घरांच्या भिंती, छप्पर कोसळून सुमारे ८४ हजाराचे नुकसान

मुसळधार पावसाचा विजयदूर्गला फटका

दोन घरांच्या भिंती, छप्पर कोसळून सुमारे ८४ हजाराचे नुकसान

देवगड : प्रतिनिधी

देवगड तालुक्यात दाणादाण उडविणाऱ्या पावसामुळे विजयदूर्ग भागातील दोन घरांच्या भिंती कोसळून, छप्परांची पडझड होवून सुमारे ८४ हजारांचे नुकसान झाले.

गेले काही दिवस पावसाने हैदोस घातला असून या पावसामुळे सोमवारी विजयदूर्ग परिसरातील दोन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.विजयदूर्ग येथील सुरेखा सुरेश नार्वेकर यांच्या घराची मातीची भिंत कोसळून व छप्पराची पडझड होवून ३२,०५० रूपये एवढे नुकसान झाले तर याच भागातील दत्ताराम मनोहर पडवळ यांच्या घराचे छप्पर, भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड होवून सुमारे ५२ हजाराचे नुकसान झाले.

संततधार पावसाने अखेर मंगळवारी विश्रांती घेतली.दिवसभर पाऊस नसल्याने नागरिकांना सुर्यदर्शन घडले.यामुळे बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ दिसून येत होती.

जाहिरात4