पाटपन्हाळे साळवीवाडी येथे नाल्याला गटार नसल्याने पाणी रस्त्यावर; ठेकेदाराचे दुर्लक्ष

पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर-विजापूर महामार्गावरील पाटपन्हाळे साळवीस्टॉप येथून आतमध्ये जाणाऱ्या रस्त्याखाली नाळा टाकला असून त्या नाळाला गटारच काढले नसल्याने हे पाणी रस्त्यावरुन जात आहे. त्यामुळे याठिकाणी साचलेल्या पाण्यामधून वाहनचालकांना पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागत आहे.

गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून ठेकेदाराने अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत कामे ठेवली आहेत. त्यातच पाटपन्हाळे साळवीस्टॉप याठिकाणी अर्धवट ठेवलेल्या कामामुळे याठिकाणी गाडीसाठी उभे असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

जाहिरात4