02 जुलै पर्यंत अति मुसळधार

रत्नागिरी : भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 29 जून 2022 ते 01 जुलै 2022 या कालावधीमध्ये दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी 40-50 कि.मी. ते 60 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तविण्यात आला असून मच्छिमारांनी सदर कालावधीत समुद्रात जावू नये. 28 जून ते 02 जुलै 2022 या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जाहिरात4