शाळा वावे तर्फे नातू नंबर १ येथे मोफत वह्या वाटप

खेड तालुक्यातील वावे तर्फे नातू नंबर १ येथे माजी विद्यार्थी श्री.अजय विठ्ठल भुवड, विजय विठ्ठल भुवड,श्री.राकेश सुरेश जिमन (चित्रकार),श्री.सचिन लक्ष्मण भुवड,श्री.महेंद्र शांताराम जाधव,श्री.प्रकाश गोपाल खोचा डे,सौ.वर्षा कुणाल कदम, व भुवड परिवार तर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी शाळेतील २० विद्यार्थिनींना १०० वह्या,६५पेन, पेन्सिल ३० नग खोडरबर,कलर पेन्सिल याचे वाटप करण्यात आले श्री.राकेश सुरेश जिमन यांनी चित्रकले बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक श्री.डी.एम.मिसाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मंगेश शिंदे ग्रा.प.सदस्य श्री. आत्माराम राक्षे, S M C सदस्य श्री.राजेंद्र भाऊ जाबरे, श्री. मनोहर शिबे,बाळकृष्ण शिबे संदीप भुवड, काशीराम बाईत, श्री.गणेश आलिम, वावे हरावडे शाळेचे मुख्याध्यापक श्री.गारे सर, अंगणवाडी सेविका मदतनिस,शिक्षिका उपस्थित हो ते. सौ पुनम वायगनकर यांनी सर्वांचे आभार मानले.

जाहिरात4