नारडुवेत मोरी खचली

प्रशासनाचे दुर्लक्ष

माखजन |वार्ताहर

संगमेश्वर तालुक्यातील माखजन नजीक कासे ते नारडुवे रस्त्यावर, नारडुवे गावात मुख्य रस्त्यावर असलेल्या मोरी खचली आहे.
या ठिकाणी भले मोठे भोक पडले असून याकडे प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
या मार्गावरून एस टी वाहतूक सुरू असून ,जर रस्त्याची डागडुजी न झाल्यास एसटी फेऱ्या बंद होतात.याचा फटका थेट माखजन येथे येणाऱ्या शाळकरी व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसणार आहे.या रस्त्याला सतत वाहतूक सुरू असल्याने येथील भोक दिवसागणिक वाढत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न केल्यास नारडुवे ग्रामस्थांसंमवेत उग्र आंदोलन छेडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते बाबू मोरे यांनी दिला आहे.

जाहिरात4