मिठगवाणे येथील डॉ. संध्या मदने यांची आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन अॅघक्युपंचर जिल्हा अध्यक्षपदी निवड

राजापूर | वार्ताहर : तालुक्यातील मिठगवाणे येथील डॉ. संध्या राजाराम मदने यांची अॅ क्युपंचर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस चेअरमन डॉ. नितीन राजे पाटील यांच्या आदेशावरून आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष .भारत), डॉ. दिशा चव्हाण यांनी डॉ. सौ. संध्या मदने यांचे कार्य पाहून त्यांची नियुक्ती केली आहे.

आपण संघटनेच्या ध्येय धोरनानुसार कार्य करून कार्यक्षेत्रात संघटन मजबूत करणे व संघटना बळकट करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे त्यांनी नियुक्ति नंतर बोलताना सांगितले. त्यांच्या नियुक्तिनंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात4