राजापूरची सुकन्या कजोल गुरव हिची आशियाई पॉवरलिप्टींग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

राजापूर | वार्ताहर : या वर्षीच्या मे महिन्यात झालेल्या पॉवरलिफ्टिंग सिनियर राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारतीय संघात निवड झालेल्या येथील कजोल गुरव हिची आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली होती. ही निवड सार्थ ठरवताना कजोलने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचा विक्रम केला आहे.
कजोलने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना ५२ किलो वजनी गटात १७५ किलो स्कॉट व ९५ किलो बेंचप्रेसमध्ये १७५ डेडलिप्ट असे एकुण ४४५ किलो वजन उचलून भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. १८ ते २१ जून या दरम्यान ही स्पर्धा पार पडली.
जिद्द आणि कठोर परिश्रम यामुळे कजोल सातत्याने यश मिळवत आली आहे.

राजापूरची सुकन्या असलेल्या कजोलने यातून राजापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकावून राजापुर वासीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
तीच्या या यशाबद्दल तिच्यावर सर्व थरावरुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. कजोल हिचे २८ जून रोजी राजापूर येथे आगमन होणार असून कजोलच्या आगमनाची राजापुरात जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती प्रतिक गुरव यांनी दिली आहे.

कठोर मेहनत आणि रेल्वेच्या तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णपदके मिळवण्याचा पराक्रम , कायम ठेवला ५२ किलो वजनी गटात आजवर तीने राष्ट्रीय स्पर्धेत एकूण पाचवेळा सुवर्णपदक मिळवले आहे. याबद्दल तीचे अभिनंदन होत आहे.

जाहिरात4