भावी आयुष्यात योग्य क्षेत्र निवडून आपल्या गावाचं आणि शाळेचे नाव उज्ज्वल करा- चेअरमन सुभाष सावंत

न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेतील इयत्ता 10 वी मध्ये 90 व 90% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेमध्ये ९०% टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभ कार्यक्रमासाठी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्री. सु. मा. सावंत, सेक्रेटरी मा. श्री शेखर (अण्णा) लिंग्रस ,खजिनदार मा. श्री.आनंद मर्ये, संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. संजयजी आग्रे, संचालक मा. श्री.संदेश सावंत (पटेल) मा. श्री. राजन चिके,पालक मा. श्री. केदार रेवडेकर. प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. सावंत एस.ए. प्रशालेतील शिक्षक श्री. पारकर सर,श्री. वाघमोडे सर, श्री. कदम सर, श्री. पेडणेकर सर आदी शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक- विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सावंत सर यांनी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी व पालक यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा२०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या एकूण १३१ विद्यार्थापैकी १३१ विद्यार्थी पास झाले.प्रशालेचा निकाल १००%लागला असून त्यांपैकी ३९ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून प्रशालेचे नाव उज्ज्वल केले. त्याबद्दल विद्यार्थी-शिक्षक यांचे अभिनंदन केले, प्रशालेमध्ये कुमारी अनुष्का मनीष गांधी हिने ९९:२०टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला, साईराज अंकुश तावडे याने ९८:८० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर अथर्व प्रसाद पारकर याने ९८:२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.

या सर्व यशस्वी विद्यार्थी व पालक यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे, पदाधिकारी यांच्याकडून गुलाब पुष्प व ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच १२ वी मध्ये मराठी विषयांमध्ये ९९/१०० मार्क मिळवून राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झालेला विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे मराठी विषय शिक्षक श्री.वाघमोडे सर यांचा गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री.शेखर लिंग्रस , संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. संजयजी आग्रे ,संचालक मा. श्री.राजन चिके, पालक श्री.दिलीप शेळके,श्री. केदार रेवडेकर,श्री.उदय ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थीयांना भविष्यामध्ये प्रयत्न करून आणि अभ्यासाच्या जीवावर यशस्वी व्हावे असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चेअरमन मा. श्री. सुभाष सावंत यांनी विद्यार्थी व शिक्षकांनी केलेल्या कार्यामुळे खऱ्या अर्थाने संस्थेचा नावलौकिक झाला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेचे नाव सतत उज्ज्वल करावे आणि भविष्यामध्ये यशस्वी व्हावे म्हणून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जोईल सर तर उपस्थित सर्व पदाधिकारी, पालक ,विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे आभार श्री. पेडणेकर सर यांनी मानले.व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना भावी जीवनात उत्तुंग यश मिळण्यासाठी या उपस्थित सर्वाकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

जाहिरात4