आ.नितेश राणेंच्या वाढदिनी वैभववाडीत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गुणगौरव

माजी नगरसेवक संताजी रावराणे पुरस्कृत उपक्रम

वैभववाडी | नरेंद्र ‌कोलते : आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक संताजी रावराणे यांच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्यात दहावी आणि बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना ब्रँडेड कंपनीचे स्मार्ट वॉच देऊन सन्मानित करण्यात आले. नितेश राणेंचा अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता म्हणून संताजी रावराणे हे ओळखले जातात. आपल्या नेत्याच्या वाढदिवशी तालुक्यातील गुणवंतांच्या सत्काराचे आयोजन संताजी रावराणे यांनी केले होते.

यावेळी यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, वैभववाडी नगराध्यक्षा नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष प्राची तावडे, माजी सभापती शुभांगी पवार, न.पं. वित्त व बांधकाम सभापती विवेक रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, नगरसेविका यामिनी वळवी, संगीता चव्हाण, सुप्रिया तांबे, सुंदराबाई निकम, रत्नाकर कदम, आशिष रावराणे, स्वप्नील खानविलकर, रितेश सुतार, प्रकाश पाटील, प्रकाश सावंत, प्रदीप जैतापकर, प्रमोद सावंत, भालचंद्र रावराणे, उदय पांचाळ, प्रकाश शेलार, श्री काटे, रज्जब रमदुल, आशिष रावराणे व भाजपा पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रज्जब रमदुल यांनी केले तर आभार संताजी रावराणे यांनी मानले.

जाहिरात4