आरोंदा येथे खार बंधाऱ्याला भगदाड

आरोंदा वागधरेनजीक कोल्याची भाट येतील प्रकार : रावमळा येथील हजारो एकर शेतजमीन खाऱ्यापाण्याखाली 

आसपास परिसरातील घरानाही यामुळे धोका

सातार्डा : प्रतिनिधी

आरोंदा येथे खार बंधाऱ्याला भगदाड पडून हजारो एकर शेतजमीन खाऱ्यापाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आरोंदा वाघधरे मुख्य बंधाऱ्यानजीक च्या कोल्याची भाट येथिल बंधारा फुटून पाणी शेतात शिरले आहे. सध्या बंधाऱ्याला सुमारे दोन मीटर रुंदीचे हे भागदाड पडले आहे. त्यामुळे मोठ्या प्रवाहाने पाणी शेत जमिनीत शिरत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतीसोबत आसपास परिसरातील घरानाही धोका निर्माण झाला आहे

याबाबत शेतकऱ्यांनी स्थानिक आरोंदा ग्रामपंचायतीला कळवून यावर उपाय योजना आखण्याबाबत मागणी केली. ग्रामपंचायतींने संबंधित खारभुमी खाते वेगुर्ला येथील कार्यालयाकडे रितसर पत्रव्यवहार केला आहे. खारबंधाऱ्याला पडलेले भागदाड त्वरित बुजवण्याची लेखी पत्र देऊन विनंती केली. मात्र संबंधित खात्याने पूर्णपणे दुर्लक्ष केला आहे. त्यामुळे हे भागदाड आणखीनच रुंद झाले आहे. त्यातून हजारो एकर शेतजमीन खाऱ्या पाण्याखाली गेली आहे, अशी माहिती ग्रामपंचायत सूत्रांनी दिली.

सदर बंधारा आताच दुरूस्त न केल्यास संबंधित शेतजमीन कायमस्वरुपी बाद होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.मात्र खारभूमी विभागाने याबाबत केले हातवर, ग्रामपंचायतीने सदर बंधारा दुरूस्त करण्याबाबत खारभूमी खात्याकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र खारभूमी खात्याच्या अधिकाऱ्यांनी बंधारा दुरूस्त करण्यास खात्याकडे निधी नसल्यामुळे , लोकसहभागातून ही दुरुस्ती करावी, असे कळविले आहे. वास्तविक समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून शेती संरक्षण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून बंधारे बांधलेले आहेत. त्याची डागडुजी दुरुस्ती करण्याची जबाबदारी त्याच खात्याची आहे.

जाहिरात4