दापोलीच्या निनाद पेवेकर याचा सत्कार

पालगड | वार्ताहर : रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळामार्फत सन २१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या विज्ञान रंजन स्पर्धेत ज्ञानदिप माध्यमिक विदयालय दापोलीचा विदयार्थी कुमार निनाद राजेंद्र पेवेकर याचा प्रथमिक गटात द्वितीय क्रमांक आला आहे. त्याला शाळेतील शिक्षक व आईवडिलांचे उत्तम मार्गदर्शन लाभले होते. निनाद याचे वडील राजेंद्र पेवेकर व आई रश्मी पेवेकर हे दोघेही शिक्षक आहेत.

बक्षिस समारंभ बुधवार दि. २२/०६/२०२२ रोजी शासकिय अध्यापक महाविद्यालय रत्नागिरी येथे पार पडला. त्याला रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे जिल्हा अध्यक्ष श्री. रवींद्र इनामदार यांचे हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आले.
कार्यक्रमासाठी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती रमा भोसले, एस.आर.दळवी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.रामचंद्र दळवी , जिंदाल कंपनी जयगडचे अनिल दधीच, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत रत्नागिरी, जिल्हा विज्ञान मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात4